हेअसे

ओळख

‘हेअसे’ ही संस्था विविध व्यवसाय, सेवा आणि वैयक्तिक वापरासाठी संकेतस्थळांची निर्मिती, देखभाल आणि पुनर्निर्माण करते. सुरक्षितता आणि आकर्षक रचना यावर विशेष लक्ष देतो. ग्राहकांच्या गरजा अचूक ओळखून त्यांच्या कल्पनांना आभासी रूप देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

ध्येय

सरळ, सुंदर आणि सर्वांना सहज संकेतस्थळे निर्माण करणे. अन त्या माध्यमातून ग्राहकाची आभासी ओळख निर्माण करणे.

दृष्टिकोण

एक विश्वासू आणि परिणामकारक सहकारी होणे. त्यासाठी लागणाऱ्या प्राविण्याची जोड देणे. सकारात्मक दृष्टीकोणातून कार्य करणे.

मुल्ये

दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करून व्यवसाय वृद्धिंगत करणे. जेणेकरून एकमेका सहाय्य करू, ही वृत्ती जोपासणे.

आम्ही कसे काम करतो?

गरज समजून घेणे

ग्राहकाच्या गरजेनुसार संकेतस्थळाच ध्येय ठरवले जाते. अन त्यानुसार कार्य केले जाते.

आराखडा तयार करणे

ग्राहकाच्या गरजेनुसार संपूर्ण माहितीच्या आधारे आराखडा तयार केला जातो. ज्यात माहितीचा क्रम ठरवला जातो.

रचना तयार करणे

आरखड्याच्या आधारे त्याच्या क्षेत्राशी संबंधित रचना केली जाते. ज्यात आकर्षक रंग, चित्रे यांचा समावेश असतो. याद्वारे संकेतस्थळ कसे दिसेल याचा अंदाज येऊ शकतो.

विकसित करणे

ग्राहकाच्या संमतीनंतर रचनेनुसार संकेतस्थळ विकसित केले जाते.

संकेतस्थळ प्रकाशन

विकसित संकेतस्थळ झाल्यावर चाचण्या पूर्ण करून संकेतस्थळ प्रकाशित केले जाते.

प्रकाशनानंतर सेवा

संकेतस्थळ प्रकाशित झाल्यावर पुढील वर्षभरसाठी निशुल्क तांत्रिक मदत दिली जाते. ज्यात संकेतस्थळ व त्यातील कार्ये सुरळीत ठेवली जातात.

कामे

संकेतस्थळ निर्मिती सेवा
संकेतस्थळ निर्मिती सेवा

आम्ही व्यावसायिक, वैयक्तिक, नोंदी (ब्लॉग), सेवा आणि उत्पादनाची या प्रकारची संकेतस्थळे तयार करू शकतो. आराखडा, रचना आणि विकास या माध्यमातून संकेतस्थळ तयार केले जाते.

previous arrow
next arrow

संपर्क साधा